[ad_1]
सांगली : हमीभावाने हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली असून, आत्तापर्यंत अवघ्या पंधरा शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. जिल्ह्यात एकच खरेदी केंद्र आहे. पन्नास शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतरच खरेदीची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.
सांगली येथे नाफेड तर्फे हरभरा खरेदी केंद्र सुरू केले आहे. हरभऱ्याला प्रति क्विंटल ५ हजार १०० रुपये हमीभाव आहे. हमी भावाने हरभरा खरेदी करण्यासाठी खरेदीची मर्यादा प्रति हेक्टरी ११.४० क्विंटल इतकी आहे. जिल्ह्यातून आत्तापर्यंत फक्त १५ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. खरेदी केंद्रात शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी आम्ही आवाहन केले आहे. अधिकाधिक शेतकरी नोंदणी करण्यासाठी पुढे येतील, अशी आशा आहे.
किमान पन्नास शेतकऱ्यांनी नोंदणी झाल्यानंतर खरेदी सुरू करण्यात येईल. शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना मोबाइलवर विक्रीसाठी घेऊन यावे, असा मेजेस दिला जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी केला जाईल, असे नाफेडच्या वतीने सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकच केंद्र
जिल्ह्यात एकच खरेदी केंद्र आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी तासगाव तालुक्यात हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. तालुक्यात सर्वाधिक खरेदी झाली होती. मात्र, गेल्या वर्षापासून जिल्ह्यात एकच केंद्र सुरू केले जात आहे. त्यामुळे तासगाव तालुक्यासह अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांना हमीभावाने हरभऱ्याची विक्री करण्यासाठी सांगली येथील खरेदी केंद्रात यावे लागते आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी एक खरेदी केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. परंतु त्याकडे कोणीही लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे.
तूर खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ
हमीभावाने तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली असली तरी, एकाही शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली नाही. वास्तविक पाहता, जत तालुक्यात प्रामुख्याने तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नोंदणी सुरू झाली तेव्हा, खरेदीची मर्यादा जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदीची मर्यादा येण्यापूर्वीच तुरीची विक्री केली होती. त्यामुळे नोंदणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली.
प्रतिक्रिया
नाफेडतर्फे सांगली येथे हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी पुढे यावे. जास्त शेतकऱ्यांनी केली तर खरेदी तत्काळ सुरू करता येईल.
-दिलीप पाटील, जिल्हा पणन अधिकारी, सांगली

[ad_2]
Source link