[ad_1]
पिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्य ही अत्यल्प प्रमाणात लागतात. मात्र, पिकांच्या जीवनचक्रात त्यांची भूमिका महत्त्वाची असते. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरेमुळे पिकांच्या वाढीवर, पिकांवर अनिष्ट परिणाम दिसून येतात.
बोरॉन
- हे अन्नद्रव्य पिकांच्या जननक्रियेत भाग घेते. कोष विभाजनाच्या प्रक्रियेकरीतादेखील बोरॉनची गरज असते. पिष्टमय पदार्थाच्या वहनास बोरॉनच्या अस्तित्वामुळे चालना मिळते. पाण्याचा पिकांवर होणारा ताण सोसण्यास बोरॉन मदत करते.
- बोरॉनची कमतरता असलेल्या पिकांच्या नत्राचे प्रमाण अधिक असते. बोरॉनची कमी हालचाल आणि कमी वाहकता असल्याने पिकांच्या मुळ्यांमधून वरच्या अवयवापर्यंत पोहोचण्याकरीता उशीर लागतो.
- बोरॉनची कमतरतेमुळे पानाचे शेंडे काळे पडतात. कोवळी पाने आणि कळ्या गळतात. वाढबिंदूची वाढ खुंटते. पेशीकोष ठिसूळ, कठीण आणि कोरडे होतात. फुले कमी येतात, फळे ठिसूळ होऊन त्यावर भेगा पडतात.
मॉलिब्डेनम
- नत्रस्थिरीकरण करणाऱ्या सूक्ष्म जंतूंची क्रियाशीलता वाढते. पिकांमध्ये मॉलेब्डेनमची कमतरता असेल तर प्रथिनांची पूर्ण वापर होत नाही. प्रथिन संश्लेषणाची क्रिया मंदावते आणि पिकांमध्ये नायट्रेटयुक्त नत्राचे प्रमाण वाढते.
- पिकांची नत्र शोषण करण्याची शक्ती मॉलेब्डेनमच्या कमतरतेमुळे जाणवते. पिकांची नत्र शोषण करण्याची स्पष्ट लक्षणे फ्लॉवरवर दिसतात. पानाच्या सर्व बाजूला गेरवा रंग येऊन पाने कोरडी पडतात. चुरमुडल्यासारखा आकार येतो. फुले-फळे गळायला लागतात. पुष्कळदा दाणे आणि फळेसुध्दा भरत नाहीत.
क्लोरीन
- प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या वेळी प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी क्लोरीनची गरज असून प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या माध्यमातून पेशीतील रसाकर्षण दाब (ऑस्मोटीक प्रेशर) उंचावतो आणि पेशीकोषातील आर्द्रता टिकविली जाते.
- क्लोरीनची कमतरता नवीन पानातील पिवळेपणा दर्शविते. पाने निस्तेज होतात. टोमॅटोच्या पानाच्या कडा कमतरतेमुळे करपतात.
सोडियम
सर्वसाधारण वनस्पती / पिकांच्या योग्य वाढीसाठी सोडीयम सूक्ष्म प्रमाणावर आवश्यक आहे. पेशी कोषामध्ये योग्य प्रमाणात आर्द्रता आणि क्षारांचा समतोल साधण्यात सोडीयमचा महत्त्वाचा भाग असतो.
कोबाल्ट
नत्रस्थिरीकरण करणाऱ्या द्विदल धान्यासाठी/सूक्ष्म प्रमाणात कोबाल्टची गरज असते. कोबाल्ट हे अन्नद्रव्य मुळ्यांच्या गाठीमध्ये अधिक प्रमाणात दिसून आले, म्हणजेच नत्रस्थिरीकरणाचा वेग आणि नत्र स्थिरीकरणाच्या सूक्ष्म जिवाणूंच्या संख्येत वाढ करण्याची क्षमता कोबाल्टमध्ये आहे.
संपर्क ः डॉ. संतोष चिक्षे, ७५८८०८२०१४
( सहाय्यक प्राध्यापक,मृद विभाग, कृषी महाविद्यालय,परभणी)

[ad_2]
Source link